करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी घेतले प्रभु वैद्यनाथचे दर्शन
करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी घेतले प्रभु वैद्यनाथचे दर्शन
परळी वैजनाथ प्रतिनिधी
करवीर पीठ कोल्हापूरचे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी महाराज यांनी आज बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.
भारतातील प्रमुख चार शंकराचार्य पिठांपैकी श्रृंगेरी पिठाचे उपपीठ म्हणून ख्याती असलेल्या कोल्हापुर येथील करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी महाराज हे मराठवाड्यात आले होते. त्यांनी परळी वैजनाथ येथे येऊन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त प्रा. प्रदीप देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, अनिल तांदळे आदींनी त्यांचे वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा