इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा

 कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा


डॉ.अजित नवले, डॉ.डी.एल कराड यांची असणार उपस्थिती


परळी / प्रतिनिधी

       सततचे अस्मानी आणि सुलतानी संकट आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी करत तात्काळ पीक विमा वितरण करावा यासह इतर मागण्याला घेत अखिल भारतीय किसान सभा बीड कडून महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार,जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला असून सततचे अस्मानी आणि सुलतानी संकटात मरण यातना सहन करत आहे.शेती विरोधी धोरणातून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावी,सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची करण्यासाठी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश अंमलबजावणी करावी,पिकविमा पारदर्शक बनवून सर्व प्रलंबित विमा मिळावा,उत्पादन खर्चावर आधारित कापसाला १०००० व सोयाबीनला ७००० हजार रु. हमीभाव देण्यात यावा,राष्ट्रीय आपत्ती निवारण कोशातून प्रभावीपणे नुकसान भरपाई देण्यात यावी, महाडीबीटी अंतर्गत वर्षांनुवर्ष प्रलंबित असणारे हक्काचे अनुदान मिळावे यांसाठी मागील पाच दशकापेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक उत्कर्षासाठी लढत असलेल्या अखिल भारतीय किसान सभा बीड च्या वतीने कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या या 16 व्या स्मृतीदिनानिमित्त माजलगाव तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शेती, शेतकरी वर्गाच्या न्याय हक्काच्या प्रश्नावर या मेळाव्यास किसान सभेचे राज्य सचिव,शेतकरी नेते डॉ.अजित नवले तर शेतमजुरांच्या प्रश्नावर सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड हे मार्गदर्शन करणार आहेत.या शेतकरी मेळाव्यास शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव चे सदस्य ताठ नित्रुग गावचे सरपंच कॉ.दत्ता डाके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!