इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रिंट मिडीया धोक्यात-दिलीपभाऊ जोशी

 स्मॉल मिडीयम न्यूज एडिटर संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी दिलीप जोशी यांची  निवड


शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रिंट मिडीया धोक्यात-दिलीप जोशी


*परळी वैजनाथ/प्रतिनिधी*

स्मॉल मिडीयम न्यूज एडिटर संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी दैनिक वंदेमातरमचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीपभाऊ जोशी यांची निवड रविवार दि.25 ऑगस्ट रोजी परळी वैजनाथ येथे  झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या व्यापक  बैठकीत करण्यात आली. 

परळी वैजनाथ येथे स्मॉल मिडीयम न्यूज एडिटर संघटनेच्या प पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जेष्ठ संपादक दिलीपभाऊ जोशी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी दिलीपभाऊ जोशी यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना दिलीपभाऊ जोशी म्हणाले की, जिल्हा दैनिक व साप्ताहिकांची राज्य शासनाकडून गळचेपी होत असून शासन जाहीराती देण्यामध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे वृत्तपत्र धोक्यात आले असून शासनाच्या विरोधात लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येणार असून जिल्हा दैनिक व साप्ताहिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही श्री जोशी म्हणाले. दरम्यान पुढे बोलतांना श्री जोशी म्हणाले की, लवकरच बीड जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असून स्मॉल मिडीयम न्यूज एडिटर संघटना जोमाने मजबुत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


बैठकीस राष्ट्रीय सचिव ईश्वरसिंग सिंगल यवतमाळ, संघटक योगेश तुरेराव, प्रदेशाध्यक्ष संतोष धरमकर, भगवान परळीकर, डॉ.भारती मुरकुटे, अनिल शिराळकर, सचिनभाऊ जोशी, प्रेमचंद राठौड, बंडू धनवे, दिनेश कपूर, शंकरराव इंदुरकर यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!