पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्याला यश
अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी:मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई......
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लागला आहे. या निर्णयानुसार अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे.
अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे, यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील गुणवंती प्रकल्पाच्या खाली १५० मीटरवर सुकळी गाव वसलेलं आहे. गावातल्या प्रत्येक घरांमध्ये सातत्यानं ओलावा येत होता. घरात आणि परिसरात असणाऱ्या ओलाव्यामुळे साप, विंचू यांसारखे प्राणी आढळण्याबरोबरच ग्रामस्थांना सतत आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या गावाच्या पनुर्वसनाची सातत्यानं मागणी होत होती. सुकळी गावच्या पुनर्वसनासाठी २००७ साली मान्यता देण्यात आली होती. मात्र विलंबामुळे या पुनर्वसनाच्या प्रकल्पाची किंमत वाढल्याने हा प्रश्न अडकून पडला होता. मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन यातील त्रुटी दूर केल्यानंतर अखेर गावचे पुनर्वसन होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा