या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे वादळ आज परळीत धडकणार
अजितदादा पवार, सुनील तटकरे, कु.अदितीताई तटकरे, धनंजय मुंडे यांसह अनेक मान्यवर राहणार उपस्थित
लाडक्या बहिणींच्या वतीने परळीत दादांचे होणार जंगी स्वागत व मिरवणूक
या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन
परळी वैद्यनाथ (दि.30) - 'लाभ आणि बळ' हे ब्रीद महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी घेऊन जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सबंध महाराष्ट्रात फिरत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे वादळ उद्या मंगळवार, दि.01 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या परळी शहरात धडकणार आहे.
लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने तसेच परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांसह प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री कु.आदीतीताई तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर, आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळासाहेब आजबे काका, मा.आ.अमरसिंह भैय्या पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परली विधानसभा अशासकीय समितीचे अध्यक्ष वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, त्याचबरोबर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांसह आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लाडक्या बहिणींचा हा मेळावा परळी वैद्यनाथ शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील मैदानात दुपारी 3 वाजता संपन्न होणार असून, तत्पूर्वी दुपारी दीड वाजल्यापासून छत्रपती संभाजी महाराज चौक (इटके कॉर्नर) येथून दादांची भव्य स्वागत मिरवून निघणार आहे. ही मिरवणूक तीन वाजता मुख्य कार्यक्रम स्थळी पोचून 3 वाजता मेळाव्यास सुरुवात होईल.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणींना लाभ आणि बळ देण्याच्या या भव्य जनसन्मान यात्रेत परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील महिला भगिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
परळीच्या अक्षराताईचा दादांच्या हस्ते होणार सन्मान
दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांच्या रकमेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक आठवड्यात 12,000 रुपयांचा नफा मिळवणाऱ्या सौ.अक्षराताई अक्षय शिंदे या ताईंचा अजितदादा व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील पात्र ठरलेल्या महिलांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा