दुःखद वार्ता:आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू प्रा.वसंतराव कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू प्रा.वसंतराव कांबळे यांचे निधन
परळी, प्रतिनिधी......
येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध मिलिंद महाविद्यालयाचे प्रा. वसंतराव कांबळे सरांचे मंगळवार दि.24 रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले.
वसंतराव कांबळे सर हे बौद्ध धम्मकार्यात सतत अग्रेसर असणारे, परळी शहरातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, सांस्कृतिक,फुले शाहु आंबेडकर चळवळीत सक्रिय योगदान देणारे ते नेते होते.वसंतराव कांबळे सरांना मंगळवार दि.24 रोजी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांना माधवबाग येथील त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आंबेडकरी चळवळीतील अनेक आंदोलनात, सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे.हरहुन्नरी नेतृत्व हरपल्याने सर्व क्षेत्रात दुःखाचे सावट व शोककळा पसरली आहे.दिवंगत वसंतराव कांबळे सरांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान प्रा. वसंत कांबळे यांच्यावर अंदाजे सायंकाळी 4 च्या सुमारास भीम नगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा