चक्रधर स्वामी यांची जयंती औष्णिक विद्युत केंद्रात साजरी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चक्रधर स्वामी यांची जयंती औष्णिक विद्युत केंद्रात साजरी
परळी/ प्रतिनिधी
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासकीय सभागृहात दि ५ रोजी चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यांच्या जीवन कार्यावर या वेळी प्रकाश टाकण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता डी डी कोकाटे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद यरणे, सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, सुरक्षा विभागाचे प्रमुख बी आर अंबड, मानव संसाधन विभागाचे महादेव वंजारे, अभियंता नंदकुमार आंधळे, ओम कुलकर्णी,बालाजी कांदे, सरोदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एच गित्ते मॅडम यांनी केलं तर उपस्थ्यांचे आभार राजू गजले यांनी मानले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा