परळीतही मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून फडणवीसच टार्गेट !

मराठ्यांचा विरोध करणाऱ्यांना पाडणार म्हणजे पाडणारच - मनोज जरांगे पाटील यांचा इशारा 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी
          आम्हाला राजकारण करायचे नाही मात्र मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर नक्कीच यांना मराठ्यांची ताकद दाखवून देऊ. फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या काड्या करणे कमी करा नाहीतर हा मराठा समाज तुमच्यामुळे भाजपाला महाराष्ट्रात बी पुरतेही ठेवणार नाही असा गंभीर इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील  यांनी परळी येथील घोंगडी बैठकीत बोलताना दिला. दरम्यान काल मध्यरात्रीच धनंजय मुंडे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीवर ते काही भाष्य करणार का? याची उत्सुकता होती. मात्र परळीतील संपूर्ण भाषणात त्यांनी धनंजय मुंडे अथवा अन्य कोणत्याही भेटीच्या या विषयावर भाष्य केले नाही.
         मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक परळी येथे आयोजित करण्यात आली होती. हलगे गार्डन मंगल कार्यालयात झालेल्या या घोंगडी बैठकीला मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांचे परळी येथे आगमन होताच त्यांची भव्य दिव्य रॅली काढून सभास्थळी आणण्यात आले. सकल मराठा समाज बांधव प्रचंड संख्येने या रॅलीतही सहभागी झाले होते. या घोंगडी बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांचे टार्गेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे संपूर्ण भाषणातून दिसून आले. त्यांनी सांगितले की , मराठा समाज हा कोणाचीही मालमत्ता नाही. मराठ्यांचा आतापर्यंत केवळ मतांसाठीच उपयोग करण्यात आला.  आपली जात महत्त्वाची समजा. आता नेत्यासाठी नाही तर आपल्या लेकरा बाळांसाठी आपली राजकीय भूमिका ठरवा. आपली एकजूट कायम ठेवावी तरच या सरकारला आपली ताकद लक्षात येणार आहे. आज मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक वळणावर येऊन ठेपलेला आहे. सरकार समोर आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जे मराठ्यांच्या बाजूने राहणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम मराठा समाजाने करावे. राजकीय भूमिका जी काही ठरेल त्या भूमिकेच्या मागे खंबीरपणाने उभे राहावे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर आपल्या जातीची हार होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्यासाठी एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी एकजुटीने व ताकतीने आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढत राहिले पाहिजे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार