हार्दिक अभिनंदन:अनुपकुमार कुसुमकर यांची निवड
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद: साहित्य तपासणी कार्यशाळा: अनुपकुमार कुसुमकर यांची निवड
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजितकरण्यात आलेल्या दोन दिवशिय साहित्य तपासणी कार्यशाळेसाठी परळी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील विषयतज्ञ शिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पत्रकार व शिक्षक म्हणून कार्यरत एक तज्ञ प्रशिक्षक म्हणून अनुपकुमार कुसुमकर यांची ओळख आहे.नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला जात असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था विविध प्रकारची प्रशिक्षणे व परीक्षणे सध्या करत आहे. या संदर्भाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे ई शैक्षणिक साहित्य टाटा कंपनीकडून सरकार घेत आहे. जगप्रसिद्ध टाटा कंपनीने तयार केलेले हे साहित्य अभ्यासक्रम सुसंगत आहे काय?विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व दर्जेदार आणि चांगले आहे का नाही? यात काय सुधारणा असाव्या? याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ञ शिक्षकांची नियुक्ती व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मोहा येथे महाराष्ट्र विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे २६ व २७ सप्टेंबर २०२४ रोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या निवडीबद्दल शिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा