रा.काँ.पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद यात्रेला डिग्रस येथून सुरुवात
रा.काँ.पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद यात्रेला डिग्रस येथून सुरुवात
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले सुदामतीताई गुट्टेंचे केले कौतुक
शेतकरी संवाद यात्रेला पहिल्या दिवशी गावागावातून उदंड प्रतिसाद
परळी (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेत्या सौ सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक नेते सुनील भैया गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली परळी मतदारसंघात होत असलेल्या शेतकरी संवाद यात्रेला पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
डिग्रस येथील कुलदैवत कालिकामातेचा आशीर्वाद घेऊन या संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली.
पहिल्या दिवशी ही यात्रा डिग्रस, पोहनेर, कासारवाडी, जळगव्हाण, रामनगर तांडा, पिंपरी बु, रामनगर तांडा, ईमान तांडा, घनाळ तांडा, गोवर्धन , हिवरा या गावांमध्ये गेली असता याप्रसंगी शेकडो शेतकरी व गावकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी हिवरा शिवारातील सोयाबीनच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या तसेच घणाळ तांडा येथे शेतातील बाजरीचे पीक काढणी करत असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या भागातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर विचारपूस करून चर्चा करण्यात आली. या शेतकरी संवाद यात्रेमध्ये ज्येष्ठ नेत्या सौ सुदामतीताई गुट्टे, युवक नेते सुनील भैया गुट्टे ,शेतकरी नेते कालिदास दादा आपेट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, उपाध्यक्ष महारुद्र कदम, तालुका सरचिटणीस जगन्नाथ काकडे ,अंबाजोगाई तालुका संघटक दत्ताभाऊ शिंदे, युवक तालुकाध्यक्ष शंकर शेजुळ ,युवक तालुका संघटक नंदकुमार दोडके, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष पवन बोडके, वैद्यकीय सेल तालुकाध्यक्ष दत्तराव घोडके, ओबीसी सेल तालुका संघटक कैलास लाकडे ,सामाजिक न्याय सेल तालुका कार्याध्यक्ष मारुती भद्रे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जगताप, युवक नेते ईश्वर जिजा सोनवणे ,व्यंकटेश राव निर्मळ ,जगमित्र पौळ, माऊली महाराज मुठाळ, बाळासाहेब मोठा, भागवत खोडके, पद्माकर धोपटे, संजय जाधव ,नेताजी साळुंखे ,दिनकर गुरुजी लव्हारे, शरद आरसुळे, अनंत हरे, ज्योतीराम हरे, योगेश जाधव, रितेश गौरकर दत्ता जाधव, धनंजय जाधव, राजेश देशमुख, मयूर जाधव ,अनिल जाधव, प्रणित आटोळे, अशोक इंगळे, दिनेश तपसे ,नरसिंह निर्मळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही शेतकरी संवाद यात्रा परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये 9 दिवस 423 किलोमीटर 86 गावं सरासरी अंदाजे दीड लाख शेतकरी, शेतमजूर व नागरिकांशी संपर्क करणार आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले सुदामतीताई गुट्टेंचे केले कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेत्या सौ सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक नेते सुनील भैया गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतकरी संवाद यात्रेची पक्षानीही दखल घेतली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई ताई गुट्टे व सुनील भैया गुट्टे यांना पत्र पाठवून यात्रेचे कौतुक करत पुढील यात्रेला शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा