मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा
नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवातील श्रींची सकाळी 11 वाजता निघणार मिरवणूक
मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा
परळी वैजनाथ: नाथ प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या 19 व्या वर्षीच्या महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन संपन्न होत असून तत्पूर्वी सकाळी ठीक अकरा वाजता श्रींची हनुमान मंदिर येथून स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडप जत्रा मैदान इथपर्यंत मिरवणूक निघणार आहे.
या मिरवणुकीनंतर स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडपाच्या बाजूस उभारण्यात आलेल्या खास शामियानामध्ये श्रींची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. परळी शहरातील प्रसिद्ध डॉ.राजाराम मुंडे डॉ.गुरुप्रसाद देशपांडे , डॉ.सतीश गुठे डॉ.सुरेश चौधरी भिकूलालजी भन्साळी या मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा