इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

गेवराई शहरातील ग्राहक पंचायत ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल बोर्डे यांना मातृशोक

 गेवराई शहरातील ग्राहक पंचायत ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल बोर्डे यांना मातृशोक 



 गेवराई,

      शहरातील ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या बीड जिल्हा कार्यकारणीचे सन्माननीय उपाध्यक्ष, गेवराई तालुका सक्रिय कार्यकर्ते, ज्येष्ठ सदस्य व श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था अध्यक्ष अनिल बोर्डे यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई बोर्डे 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेवराई शहरात काकी म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या पाश्चात दोन मुले व दोन मुली नातवंड व पतंवड मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 30/9/24 रोजी चिंतेश्वर स्मशानभूमी येथे संपन्न झाला. अंत्यविधीसाठी गेवराई शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जनसमूह उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या