परळीतील नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.प्रा. मधुकर आघाव यांची नियुक्ती
परळीतील नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.प्रा. मधुकर आघाव यांची नियुक्ती
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परळी तालुक्यामध्ये राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये डॉ आघाव यांची यशस्वी वाटचाल राहिलेली आहे. वैद्यनाथ उद्योग समूहाचे चेअरमन म्हणून त्यांनी अनेक फर्म यशस्वी चालविल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे. वाणिज्य विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर त्यांची वाणिज्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील काही पुस्तके प्रकाशित आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या प्रशासकीय कामांचा लाभ महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी व्हावा व संस्थेची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडावी म्हणून क्षीरसागर कुटुंबीयांनी त्यांच्यावर विश्वास दर्शविलेला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सचिव डॉ भारतभुषण क्षीरसागर, संस्थेच्या मार्गदर्शक डॉ. दीपाताई क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ सारिका क्षीरसागर तसेच नवगण महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे डॉ अनिल घुगे, बाळासाहेब देशमुख, उदगीरकर, संस्थेच्या प्रशासकीय समितीचे देशमाने, गुट्टे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे आदींनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा