23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं?

 धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं?


परळीत आज घोंगडी बैठक: मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली पहाटे ३ वा. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट

परळी वैजनाथ: शनिवारी ७ जुलैच्या मध्यरात्री कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. अंतरवली सराटी येथे जाऊन मुंडे यांनी ही भेट घेतली. मुंडे आणि जरांगे यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलनाता जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या बैठकीत काही विशेष चर्चा झाली नसून फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. 

          आज सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मध्यरात्री मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आमच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मध्ये ते आंदोलनात मध्यस्तीही होते. आरक्षणावरही चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत आम्ही पाडायचे आहेत की उभा करायचे आहेत, याचाच अजून निर्णय झालेला नाही. निवडणुकीवर या बैठकीत काहीही चर्चा झालेली नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केले. 

"मी माझ्या मुद्द्यावर आजही ठाम आहे. गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर मी ठाम आहे. त्यांनीच आधी यावर सूचना काढली आहे. आमच्या तीनही गॅझेटवर चर्चा झाली होती, तेही त्या बैठकीत उपस्थित होते, असंही जरांगे पाटील म्हणाले. "घोंगडी बैठक ताकदीने होणार आहेत, गरीब मराठा घरी बसणार नाही. जातीसाठी सगळी एकत्र येणार. मी आहे तो पर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही. मी महाविकास आघाडीचा नाही आणि महायुतीचाही नाही. अंतरवली सराटी येथे कोणही येऊ शकतो. मी फक्त मराठा समाजाचा आहे, असंही जरांगे म्हणाले. 

'चांगलं काम केल्यावर कौतुकही करणार'

"शंभुराज देसाई यांनी कुणबींना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली ओबीसी समाजाला, मी त्यावेळी फक्त कुणबींना करा म्हटलं असतं. पण तसं मी नाही केलं. सगळ्याच जातीचं होऊद्याना कल्याण. मी जातीयवादी नाही. त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुकही केलं पाहिजे. आता कृषी मंत्र्यांनीही चांगलं काम केलं तर त्यांचही आम्ही कौतुक करणार, असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 

"माझ्या समाजाला माहिती आहे, कोणही मला भेटायला आले तरीही मी कोणाचा होत नाही. मी माझ्या समाजाचा आहे. काल रात्री तीन वाजता ते मला भेटायला आले होते तेव्हा मी त्यांची भेट घेतली. भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

'कधीही निवडणूक होऊद्या आम्ही तयार'

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या जवळ आमचचं मतदान आहे. हे कधीही निवडणूक घेऊद्यात, आमचं पाडायचं ठरलं तर आम्ही पाडणार आणि जर आमचं लढायचं ठरलं तर आम्ही तयारच आहे. फक्त आता आम्हाला एक बैठक घ्यायची आहे. आम्ही सगळ्यांना तयार राहण्यासाठी सांगितलं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?