कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 राज्याच्या कृषी पुरस्कारांचे रविवारी मुंबईत राज्यपालांच्या हस्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती


मुंबई दि. 27 सप्टेंबर 2024

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सायं. 5 वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 


कोविड तसेच विविध कारणामुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षातील एकूण 448 पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


या कार्यक्रमांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (1), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (8), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार(8), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार(8), वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार (8), उद्यान पंडित पुरस्कार(8), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (40), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार(10), युवा शेतकरी पुरस्कार(8), अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजनेतील पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.


कृषी पुरस्कारांच्या रकमेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ पट इतकी घसघाशीत वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेतला होता. तसेच पुरस्कार विजेत्यांना उपस्थित राहण्यासाठी दैनिक प्रवास भत्ता रकमेत सुद्धा वाढ करण्यात आली होती. 


या कार्यक्रमास शेतकरी- नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !