‘मुख्यमंत्री – माझी लाडकीबहीण’ योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला मिळणार

 ‘मुख्यमंत्री – माझी लाडकीबहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे



मुंबई, दि. २३ : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

आज मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज  मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

दि.२९ सप्टेंबर २०२४  रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा  राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.

व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार