MB NEWS:सलग 9 दिवस,423 कि.मी.86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी
रविवार पासून सुनील गुट्टेंची परळी मतदार संघात शेतकरी संवाद यात्रा
सलग 9 दिवस, 9 मुक्काम, 423 कि.मी.प्रवास व 86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी
परळी, प्रतिनिधी...
परळी मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते सुनील गुट्टे हे परळी मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा करणार आहेत. रविवार दि.29 सप्टेंबर ते 9 आँक्टोंबर दरम्यान यक संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
युवानेते सुनील गुट्टे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघातील डिग्रस येथून या शेतकरी संवाद यात्रेला रविवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी प्रारंभ होणार असुन 9 आँक्टोंबर रोजी परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे समारोप होणार आहे. ही यात्रा जवळपास पुर्ण परळी विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.
सलग 9 दिवस,9 मुक्काम,86 गावे,423 कि.मी.अंतर कापत या शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधणार आहोत असे युवानेते सुनील गुट्टे यांनी सांगितले.या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्ना विषयी संवाद, पीक विमा,अनुदान,अदी शेती विषयी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन शासन दरबारी मांडुन ख-या अर्थाने जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी माय बाप जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या यात्रेची संकल्पना असल्याचे युवानेते सुनील गुट्टे यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा