इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

या 15 जणांना एबी फॉर्मचं वाटप

 अजित पवारांकडून उमेदवार यादीपूर्वीच 15 जणांना एबी फॉर्मचं वाटप


राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर होऊ शकते. यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत आहेत.
        राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर होऊ शकते. यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी (NCP Ajit Pawar Group Candidate List) आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 15 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.


15 जणांना एबी फॉर्मचं वाटप



• राजेश विटेकर 


• संजय बनसोडे


• चेतन तुपे


• सुनील टिंगरे


• दिलीप वळसे पाटील


• दौलत दरोडा


• राजेश पाटील


• दत्तात्रय भरणे


• आशुतोष काळे


• हिरामण खोसकर 


• ⁠नरहरी झिरवळ


• ⁠छगन भुजबळ


• ⁠भरत गावित 


• ⁠बाबासाहेब पाटील


• ⁠अतुल बेनके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!