कामगार अपघातात मृत झाल्यास 5 लाखांचे कवच, उपचारांसाठी देखील मिळणार निधी, पशूंनाही सानुग्रह अनुदानाचे कवच

 गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत अपघातासाठी सानुग्रह अनुदान योजनेचे कवच लागू


धनंजय मुंडेंची स्वप्नपूर्ती, शासन निर्णय निर्गमित


कामगार अपघातात मृत झाल्यास 5 लाखांचे कवच, उपचारांसाठी देखील मिळणार निधी, पशूंनाही सानुग्रह अनुदानाचे कवच


मुंबई (दि. 09) - सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी लावलेल्या रोपट्याला आता फळे येताना दिसत असून नुकत्याच राज्य शासनाने ऊसतोड कामगारांसाठी घोषित केलेल्या अपघात विमा कवचाला सानुग्रह अनुदान योजनेचे मूर्त स्वरूपात प्राप्त झाले असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 


स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून ऊस तोडणीच्या हंगामात कोणत्याही प्रकारच्या अपघातामध्ये ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याला पाच लाखांचे कवच या योजनेतून देण्यात येणार आहे, तर कायमचे अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. 


ऊसतोड कामगारांच्या झोपडी व साहित्याला 10 हजारांचे, वैयक्तिक अपघातात उपचारासाठी 50 हजार रुपयांचे, लहान बैलजोडी मृत झाल्यास 75 हजार रुपयांचे तर मोठी बैलजोडी मृत झाल्यास 1 लाख रुपयांचे कवच या सानुग्रह अनुदान योजनेतून लागू करण्यात आले आहे. 


अत्यंत कमीत कमी कागदपत्रे तसेच जिल्हा स्तरावर मंजुरीचे अधिकार दिल्याने खऱ्या अर्थाने ऊसतोड कामगारांना या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे. 


आजवर ऊसतोड कामगारांची कुठे कागदावर नोंद सुद्धा नसायची, मात्र सध्याचे कृषिमंत्री व तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप मिळाले. त्याला कायमस्वरूपी निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. महामंडळाच्या माध्यमातुन धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवानबाबा शासकीय वस्तीगृह योजनेतून तब्बल 82 वसतिगृहे सुरू करण्यात आली. ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली. त्यापाठोपाठ आता अत्यंत जोखमीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम तसेच कामगारांची बैलजोडी ते अगदी झोपडी व त्यातील साहित्याला अपघात व नैसर्गिक आपत्ती अपघाता मुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सानुग्रह अनुदान योजना लागू केल्याने, धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी पाहिलेले आणखी स्वप्न पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. 


राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम, बैलजोडी, झोपडी आदींना सानुग्रह अनुदान योजना लागू केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?