घाटनांदूर येथील शादीखान्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली पूर्ण

शादीखान्यासाठी 75 लाख रुपये निधी मंजूर


मुंबई (दि. 15) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील घाटनांदूर येथील मुस्लिम बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, आज आचार संहिता लागण्यापूर्वी घाटनांदूर येथील शादीखाना उभारण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाकडून 75 लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 


याबाबतचा शासन निर्णय अल्पसंख्यांक विकास विभागाकडून आज निर्गमित करण्यात आला असून, याबद्दल धनंजय मुंडे यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत. 


धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून याआधी सिरसाळा येथील शादीखान्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बरदापुर, पोहनेर, मिरवट, धसवाडी, पिंपळा धायगुडा आदी गावांमध्ये शादीखाने उभारण्यास निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार