आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

मला टार्गेट करणाऱ्यांना इथली जनता उत्तर देईल - धनंजय मुंडे

आँक्टोबर व नोव्हेंबरचे लाडकी बहिण योजनेचे पैसे १० आँक्टोबर पर्यंत देणार !

समाजातील सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल विकासासाठी हे सरकार वचनबद्ध - अजितदादा पवार


धनंजय मुंडेंना २०२४ नंतर मोठी जबाबदारी -सुनील तटकरे


मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, मला टार्गेट करणाऱ्यांना इथली जनता उत्तर देईल - धनंजय मुंडे


परळी वैजनाथ (दि.01) : समाजातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल  विकास करण्यासाठी महायुतीचे हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परळी येथे दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी परळी येथील जन सन्मान यात्रेत केली. तर धनंजय मुंडे यांच्यावर 2024 नंतर मोठी जबाबदारी असणार आहे असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना दिले अजित दादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणतीच कमतरता नसल्याने बीड जिल्ह्याचा सर्वंकष विकास निश्चित करू अशी ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

          राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे आयोजन  परळी शहरात करण्यात आले होते.लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने तसेच परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी व नागरिकांशी  ना.अजितदादा पवार यांसह प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी संवाद साधला. शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील मैदानात अभूतपूर्व सभा झाली.तत्पूर्वी  भव्य स्वागत मिरवून  काढण्यात आली होती.

   यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले की,   आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडत नाही.आपल्याला विकास साधायचा असेल तर बीड-परभणीमध्ये विमानतळ होणं अत्यावश्यक आहे.. तरच एमआयडीसी, कारखानदारी येईल.रोजगार निर्मिती होईल.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे.आँक्टोबर व नोहेबरचे लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्ही १० आँक्टोबर पर्यंत देणार आहोत. है पैसे स्वतः साठी वापरा, महिलांनी सन्मानांनी राहावे यासाठीच ही योजना आणली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.बीड जिल्ह्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर प्रेम करते. माझे बीड जिल्ह्यावर प्रेम, परळीकरांवर विशेष प्रेम आहे. तालुक्यातील वडखेल येथे लवकरच सिताफळ इस्टेट उभी करणार आहोत, जिरेवाडी येथे शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. शासनाच्या योजना तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या योजनांच्या माध्यमातूनमहिलांना सक्षम, आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आहे. १० व्या अर्थसंकल्पात महिलांना समोर ठेवून योजना ठरवण्यात आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर ४६ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. केंद्रातील सरकार आपल्या विचारांचे असल्याने आम्ही म्हटल्या बरोबर कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे. हे सरकार सर्वांगीण व समतोल विकास साधणारे सरकार असून विरोधकांच्या भुलतापाला बळी न पडता व सर्व लाभार्थ्यांना दिलेले सर्व लाभ कायमस्वरूपी ठेवण्यासाठी महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणाने उभे रहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


 ●  *धनंजय मुंडेंना २०२४ नंतर मोठी जबाबदारी -सुनील तटकरे*

----------------------

           कृषीमंत्री धनंजय मुंडेंना २०२४ नंतर मोठी जबाबदारी देवू असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत तटकरे यांनी केले.धनंजय मुंडे तुम्ही परळी पुरते नेते नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहात, गोपीनाथ मुंडे नंतर विरोधी पक्षनेता कसा असावा हे धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला दाखवले .आगामी विधानसभा निवडणुकीत फॉर्म भरायला धनंजय मुंडे येतील बाकी पूर्ण वेळ राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची जिम्मेदारी त्यांच्यावर असेल. आयोजन नियोजन आणि जन संघटन याचे मोठ्या कौशल्य धनंजय मुंडे यांच्याकडे आहे ते एक प्रकारे शो मॅन असल्याचे गौरवोद्गार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले.


*मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, मला टार्गेट करणाऱ्यांना इथली जनता उत्तर देईल - धनंजय मुंडे*


विकासाच्या मुद्द्यावर आपण दादांच्या निर्णयाला साथ दिली, दादांच्या बोटाला धरून मी पक्षात आलो. जिथे एक पंचायत समिती सदस्य नव्हता त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 90% यश मिळवून दिले. मात्र दादांच्या नेतृत्वात आम्ही न्यायाची साथ स्वीकारल्यापासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. मात्र मला टार्गेट करणाऱ्यांना माझ्या परळीची जनता मतपेटीतून उत्तर देईल, असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.


उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध योजना व महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण होत आहेत. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे त्याच अनुषंगाने दादांच्या आशीर्वादाने व नेतृत्वाखाली काम करताना बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही निधीची आपल्याला कमतरता नाही. बीड जिल्ह्यासाठी दादांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे व अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झालेले आहेत. दादांचा वादा हा पक्का आहे त्यामुळे दादांना येणाऱ्या काळात पाठबळ देण्याचा वादाही आपल्याला निश्चित करावा लागेल, त्या दृष्टीने सर्वांनी आपले आशीर्वाद दादांच्या मागे उभे करावेत असे आवाहन यावेळी ना धनंजय मुंडे यांनी केले. 


*अक्षराताईचा सत्कार अन दादा म्हणाले, ये तिला दीडशे रुपये द्यारे...*


दरम्यान लाडक्या बहिण  योजनेचा लाभ घेऊन त्या रक्कमेतून स्वतःचा सजावट वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरू केलेल्या परळीतील अक्षराताई शिंदे या तरुणीचा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अक्षराताईने स्वतःच्या हाताने बनवलेल्या सजावटीच्या वटवृक्षाची भेट अजितदादाना दिली, मात्र दादांनी ताई, तू हे विकायला तयार केलेस ना? मग किती रुपयांना विकतेस? असा प्रश्न अक्षराला करताच, अक्षराने दीडशे रुपये सांगितले. त्याबरोबर दादांनी आपल्या कर्मचाऱ्याला जवळ बोलावून, ताईला दिडशे रुपये दे रे... असा आदेशच दिला!


*भव्य रॅली...*


दरम्यान परळी शहरात आगमन होताच अजितदादा पवार व मान्यवरांची भव्य रॅलीद्वारे मिरवणूक काढण्यात आली,  यावेळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक, रेल्वे ओव्हर, ब्रिज एक मिनार चौक, यांसह ठिकाणी स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार धनंजय मुंडे यांचा इतर मान्यवरांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यारलीमुळे जनसमान यात्रेचे एक गुलाबी रंगाचे वादळ परळी मध्ये निर्माण झाले होते. 


या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, कल्याणराव आखाडे, अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, राजकिशोर मोदी, युवतीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, दत्ता पाटील, गोविंदराव देशमुख, फारूक पटेल, बाजीराव धर्माधिकारी, राजाभाऊ औताडे, वैजनाथराव सोळंके, युवकांचे जिल्हाध्यक्ष सुशांत पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई खोसरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य अनेराव, युवतीच्या प्रिया डोईफोडे, यांसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?