धनंजय मुंडे प्रथमच उपस्थित राहणार

 पंकजा मुंडेंचा भगवान भक्तीगडावर दशकपूर्ती दसरा मेळावा: धनंजय मुंडे प्रथमच उपस्थित राहणार !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट, भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये गत दहा वर्षापासून दसरा मेळावा होतो. या मेळाव्याला आतापर्यंत धनंजय मुंडे हे कधीही उपस्थित राहिले नव्हते. परंतु आता प्रथमच धनंजय मुंडे या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे.
         बीड जिल्ह्यात यावेळी दोन दसरा मेळावे लक्षवेधी होणार आहेत. यामध्ये नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे. याबरोबरच भगवान भक्ती गड येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असलेला दसरा मेळावा देखील प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या मेळाव्यात आज पर्यंत पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थितीत असायची. धनंजय मुंडे कधीही या मेळाव्याला उपस्थित राहिले नव्हते. परंतु यंदा प्रथमच धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंडे बहिण भाऊ या मेळाव्यातून काय बोलतात आणि आगामी राजकीय दिशा कशी स्पष्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे धनंजय मुंडेंची पोस्ट....


चलो भगवान भक्तीगड...!

आपला दसरा, आपली परंपरा...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!
Pankaja Gopinath Munde
#DasaraMelava
#BhagwanBhaktigad

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार