शासन निर्णय निर्गमित; मुंडेंनी मानले उदय सामंत यांचे आभार
धनंजय मुंडेंची मागणी मित्र उदय सामंतांनी केली पूर्ण
बीड जिल्हा उद्योग भवन उभारणीसाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान
शासन निर्णय निर्गमित; मुंडेंनी मानले उदय सामंत यांचे आभार
मुंबई (दि. 09) - केंद्र व राज्य शासनाच्या औद्योगिक विकासाच्या धोरणाला अनुसरून बीड जिल्ह्यामध्ये उद्योग उभारणी बाबतच्या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने जिल्ह्याचे अध्ययवत व सर्व सोयी युक्त असे उद्योग भवन असावे, याबाबतची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती, आपल्या मित्राची मागणी उदय सामंत यांनी मान्य केले असून बीड जिल्ह्यात सर्व सोयुक्त अध्यायावत उद्योग भवन उभारण्यासाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील उद्योजकांना एकाच ठिकाणी उद्योग उभारणी बाबतच्या सर्व सेवा मिळाव्यात या दृष्टीने हे उद्योग भवन अत्यंत उपयुक्त ठरणार असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीला अनुसरून सात जून रोजी झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी याबाबतचा प्रस्ताव मागवला होता.
सदर उद्योग भवन हे सर्व सोयींनी युक्त तसेच संपूर्णपणे सौर उर्जेवर निर्भर असणार आहे, बांधकाम फर्निचर यासह विविध सुविधांसाठी एकूण 14 कोटी 69 लाख 28 हजार रुपये इतका निधी खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबद्दल धनंजय मुंडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा