परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

भगवानगडाच्या चतुर्थ महंतांची निवड!

कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी; कोण आहेत महंत कृष्णा महाराज शास्त्री ? कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...



पाथर्डी....
           संत भगवानबाबांची समाधी असलेल्या भगवानगडाचे उत्तराधिकारी म्हणून एकनाथवाडी (ता. पाथर्डी) येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी निवड केली आहे. येथील संत ज्ञानेश्वर मंदिर २०२६ मध्ये पूर्ण होणार असून, त्याचवर्षी गडाचा अमृतमहोत्सवही आहे. त्यामुळे याच कार्यक्रमात कृष्णा महाराज शास्त्री यांच्याकडे गादीचे हस्तांतर होणार आहे. भगवानगडाचे ते चौथे महंत असतील.
         सोमवारी (दि.१४) एकनाथवाडी येथून ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजता कृष्णा महाराज शास्त्री यांना रथामध्ये बसवून ढोल, ताशा, टाळ, मृदंगाच्या निनादात हरिनामाचा जयघोष करत भगवानगडावर पोहोचविले. एकनाथवाडीपासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी, मालेवाडी, खरवंडी कासार, कीर्तनवाडी गावांमध्ये कृष्णा महाराज शास्त्री यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. ठिकठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षावही केला. सायंकाळी ५ वाजता कृष्णा महाराज भगवानगड वर पोहोचल्यानंतर गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी महाराज यांनी एकनाथवाडी ग्रामस्थांचे भगवान बाबांची प्रतिमा देऊन स्वागत केले.

२०२६ मध्ये भगवानगडाचा अमृतमहोत्सव आहे. त्याचवर्षी संत ज्ञानेश्वर यांच्या मंदिराचे कामही पूर्ण होणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल, असे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगडाचा विकास करतील, असा पूर्ण विश्वास आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे. अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी दिला आहे, असेही डॉ. नामदेव शास्त्री यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरीचा अभ्यास...

कृष्णा महाराज शास्त्री यांचे मूळ गाव तेलंगणा राज्यात आहे. त्यांनी बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात ज्ञानेश्वरीचे शिक्षण घेतले. त्यांनी एमएही केले आहे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी त्यांना डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे मागदर्शन लाभले. तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे ते महंत झाले. कृष्णा ‌‌महाराज यांच्या विषयी सांगायचे म्हणजे त्यांचे मूळ गाव तेलंगणा असून ते बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरती आले. ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये झाले. त्यांचे एम ए पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी बारा वर्षे ज्ञानेश्वरचे संपूर्ण शिक्षण डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून घेतले आहे. त्यांना तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्था या ठिकाणी महंत म्हणून नियुक्त करण्यात आले होते..भगवान गडावरील उत्तराधिकारी या विषयीचे ऑफिशियली ठराव झालेले आहेत. गडावरती श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराचे काम सुरू असून ते काम 2026 ला पूर्ण होणार आहे. त्याच वर्षी भगवानगडाचा अमृत महोत्सव असून या अमृत महोत्सवामध्ये नवनियुक्त महंत कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल, असे डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले.

महंत नामदेव शास्त्रींना विश्वास....
        पुढील काळामध्ये कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगड व भगवानगडाचा विकास करतील याचा संपूर्ण विश्वास मला आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी मला दिला आहे असे यावेळी शास्त्री यांनी सांगितले. 

टिप्पण्या

  1. रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी रामकृष्ण हारी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!