भजन हे परमात्माशी संवाद साधण्याचे माध्यम- अमोल महाराज बोधले
महिला भजन स्पर्धेत कळंब प्रथम, परळी द्वितीय तर उदगीर केंद्रास तृतीय पारितोषिक
भजन हे परमात्माशी संवाद साधण्याचे माध्यम- अमोल महाराज बोधले
परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या महिला भजन स्पर्धेत कळंब प्रथम, परळी द्वितीय तर उदगीर येथील भजनी मंडळाने तृतीय पारितोषिक पटकावले. तर कामगार पुरुष भजन स्पर्धेत निलंगा प्रथम, कळंब द्वितीय तर बीडला तृतीय पारितोषिक मिळाले.
धाराशिव येथील कामगार कल्याण भवनमध्ये शनिवारी ( दि. ५) या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत लातुर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील ८ भजनी मंडळानी सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी संघांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या स्पर्धेतचे पारितोषिक वितरण जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रमुख पाहूणे ह.भ.प.अमोल महाराज बोधले, महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनचे मुंबईचे मा. अध्यक्ष भागवतराव धस, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, परिक्षक सुनिताताई आडसुळ, ह.भ.प.पांडुरंग शिंपले, योगेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती झाले.
प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यानी केले. महिला भजन स्पर्धेत कळंब संघाने प्रथम, परळी द्वितीय तर उदगीरच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले. तर कामगार पुरुष भजन स्पर्धेत निलंगा प्रथम, कळंब द्वितीय तर बीडला तृतीय पारितोषिक मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश्वर जिरगे यानी केले तर आभार सलीम पठाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा