पाटलांचे खंदे समर्थक ऋषीकेश बेदरे यांची उपस्थिती
मराठायोध्दा जरांगे पाटील समर्थक विजकुमार वाव्हळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आमदारकीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केज मतदारसंघात निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता जरांगे पाटलांच्या ‘गणितामुळे’ पारंपारिक ‘समीकरणे’ बदलण्याची शक्यता!
पाटलांचे खंदे समर्थक ऋषीकेश बेदरे यांची उपस्थिती
केज / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीने चांगलाच रंग धरला आहे. इच्छुकांच्या गर्दीने विधानसभेचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत केवळ जरांगे फॅक्टर चालणार असुन त्याचा परिणाम पुर्ण राज्यात पहायला मिळत आहे. जरांगे पाटलांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला गनिमी कावा अजुन तरी स्पष्ट केलेला नाही. यामुळे रणनिती आखण्यास प्रस्थापिक सत्ताधारी, विरोधी पक्षांना घाम फुटला आहे. तर रणनिती नेमकी काय असावी याचा मेळ बसताना दिसत नाही.
जरांगे पाटलांच्या सुचनेवरून मराठा आरक्षणाला समर्थन देणार्या सर्व इच्छुक उमेदवारांना विधानसभेचे अर्ज भरण्यास सांगितले आहे. यातील कुठला अर्ज ठेवायचा, कुणाला उमेदवारी द्यायची हे येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत स्पष्ट होणार आहे. यावरून केज विधानसभा मतदार संघात राखीव जागेवर आज उद्योजक तथा संपादक विजयकुमार वाव्हळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मनोज दादा जरांगे पाटील समर्थक यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.
यावेळी समर्थकांची गर्दी जमा करून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयकुमार वाव्हळ यांनी आपल्या कार्यकाळात केज मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचे वचन दिले. मराठा आरक्षण, सगे सोरर्याची अंमलबजावणी, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यासारख्या मुद्द्यांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मनोज जरांगे पाटलांचे खंदे समर्थक ऋषीकेश बेदरे, प्रभाकर थोरात, चव्हाण साहेब, भाऊसाहेब निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज केज मतदारसंघासाठी प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि स्वतंत्र उमेदवारांनी मोठ्या जल्लोषात आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. जरांगे पाटलांच्या सुचनेवरून आज केज विधानसभा मतदार संघात राखीव जागेवर आज उद्योजक तथा संपादक विजयकुमार वाव्हळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मनोज दादा जरांगे पाटील समर्थक यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.
आज तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर समर्थकांसह उपस्थित राहून विजयकुमार वाव्हळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांचे वचन दिले, तसेच भविष्यातील योजनांची माहिती देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणासाठी असणार कटीबध्द ः केज-अंबाजोगाई मतदार संघातील जनतेने एकदा संधी द्यावी या संधीचे सोने करत मनोज दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करून, मराठा आरक्षणासाठी पुर्ण समर्थन असुन कायद्याच्या रक्षणासाठी पुढे येवू, सगे सोयर्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहु, मराठा, मुस्लिम, दलित समाजाच्या हक्कासाठी कटीबध्द आहोत.
नवोदितांना संधी ः यंदाच्या निवडणुकीत मनोज दादा जरांगे पाटलांच्या यांच्या सुचनेनुसार काही नवोदित उमेदवारांना संधी मिळत असल्याचा आनंद यावेळीं त्यांनी व्यक्त केला. आज पर्यंत केवळ प्रस्थापित नेत्यांनी आपल्या सोयीचे राजकारण केले. गोर गरीब, गरजवंतांचा केवळ वोट बँक म्हणून वापर केला. परंतु आता यंदाच्या निवडणुकीत आमच्या सारख्या नवोदितांना संधी दिल्याबद्दल वाव्हळ यांनी जरांगे पाटलांचे आभार मानले आहेत.
कार्यकर्त्यांचे उत्साह: उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयकुमार वाव्हळ यांच्या कार्यकर्त्यांनी व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असल्याचे दिसुन आले.
केज मतदारसंघातील प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांचे नाव निश्चित करून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु त्यांच्या विजयात मोठा असणार्या मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवले असल्याने मागील दीड वर्षापासून चालु असलेल्या मनोज दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने तालुक्यातील मराठा सत्ताधारी उमेदवारावर प्रचंड नाराज आहे. पाटलांच्या सुचनेनुसार आता पाटलांनी आपले शिलेदार मैदानात उतरवण्याचे ठरवले. यावरून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांत चिंतेचे वातावरण पसरल आहे. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार विकासाच्या वचनांसह अर्ज दाखल करताना दिसले, तर विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी सत्ताधार्यांच्या अपयशावर निशाणा साधला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर आता अर्जांची तपासणी होणार असून, अधिकृत उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध होईल. केज मतदारसंघातील ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येक उमेदवाराने आपल्या समर्थकांसह मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे.
जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि समाजासाठीचा त्यांचा त्याग पाहता, त्यांना मराठा समाजासह इतर वर्गांचाही पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात नव्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. यावरून त्यांनी आता आपले शिलेदार उभे करण्याच्या सुचना केल्यामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळु सरकली आहे.
चौकट
मनोज जरांगे पाटील राजकारणात प्रवेश
मराठा आंदोलनाला नवा राजकीय चेहरा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील आता सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यात त्यांनी मोठा जनाधार मिळवला आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे, आणि त्यांच्या या लढ्याला अनेक युवक आणि मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
जरांगे पाटील यांच्या राजकारणात प्रवेशामुळे मराठा समाजाला एक नवीन, तडफदार नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे तरुण वर्ग आणि मराठा समाज त्यांना पाठिंबा देत आहेत, ज्यामुळे राज्यातील पारंपरिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा