उद्यमी कार्यकर्ता! संवेदनशील युवा नेता दूरदृष्टीचा माणूस

राजेभाऊ फड: बहुआयामी उच्चशिक्षीत व्यक्तिमत्व...

विधानसभा मतदारसंघ हा राज्याला ओळख असलेला मतदारसंघ आहे. वेद्यजाय स्थानक असल्याने दळण वळणाच्या चाबतीत जोडल्या गेलेले शहर येथील अर्थव्यवस्था ही बहुतांश कृषी केंद्रित अर्थव्यवस्था आहे. जसा हा भाग ऊसतोड मजुरांचा भाग म्हणून ओळखला जातो तसाच हा भाग विविध अंगांनी ओळखला जातो. राजकीय दृष्ट्या राज्याला परिचित असलेला हा मतदार संघ आणि तालुका आहे. पूर्वीचा रेणापूर असलेला हा मतदारसंघ १९९२ ला परळी मतदार संघात रूपांतरित झाला. या मतदार संघाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कायम पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिलेला मतदार संघ आहे. अण्णाभाऊ मिते, रघुनाथराव मुंडे, पंडितराव दौड, स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे मोठे नेतृत्व या भागाने राज्याला दिलेले आहेत. सोयाचीन, उऊस, कापूस उत्पादक शेतक-यांची संख्या इये मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येईल राजकीय दृष्ट्या फार संवेदनशील असलेला हा माग आहे. राज्यातील बड्या नेतृत्वापैकी शरद पवारांच्या आणि गोपीनाथराव मुंडे यांच्याच विचारांच्या पाठीशी उभा असलेला हा भाग आहे. अलीकडव्या काळात राजकीय अदलाबदलीत जुजेच परंतु नव्याने राजकीय पटलावर उदयास आलेले व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ फड त्यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने परळी मतदारसंघात हे नाव विशेष अथनि आता पुढे आले आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जरी हे नाव नव्याने आले असेल तरीही त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. सामाजिक कायचि व्यासंगी व्यक्तित्व असल्याने मोठा लोकसंपर्क आहे, कारखानदार आणि व्यावसायिक असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. उच्च शिक्षित असल्याने महिला मुली आणि विद्यार्थ्यांच्या नेमक्या प्रश्नांची जाण आहे त्यांच्या व्यक्तित्वव्या जुन्याच परिचयाचा हा नव्याने धांडोळा..

०३ जून १९८०रोजी राजाभाऊ फड यांचा कनोरवाडी येथेजन्म झाला इथेच प्राथमिक शिक्षणणझाले आणि परळी वैजनाथ येथे पुढील शिक्षण त्यांनी घेतले.पदवीचे शिक्षण  बीपीएड पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनातच चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आज जरी राजकीय क्षेत्रात त्यांची नव्याने ओळख महाराष्ट्राला झाली असली तरी ते मागील अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांचे सासरे आ.रत्नाकर  गुट्टे यांना २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्यात किंगमेकर म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि रणमैदानात त्यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवत आलेल्या अडचणीसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आजही करत आहेत. जनतेला दिला प्रत्येक शब्दपूर्ण करण्यासाठी ते प्रत्येकाच्या हाकेला धावून जातात. एकदा जुळलेली नाळ ते कधीही तुटू देत नाहीत. त्यामुळे त्यांचा सर्वदूर संपर्क आहे ही त्यांच्या जमेची विशेष बाजू आहे असे म्हणावे लागेल. प्रत्यक्षात जाऊन काम करणे याचा अर्थ काय...? तर सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना ज्या लोकांच्या पाठबळावर आपण राजकारण करतो त्यांच्या प्रत्येक अडचणीला धावून जाणे हा राजाभाऊ फड यांचा स्वभाव. स्वतःच्या आईला सरपंच करण्याचे आणि हेलिकॉप्टरने गावात घेऊन येण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले. जोपर्यंत आई सरपंच आहेत तोपर्यंत गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नाला १० हजार रुपयांची मदत करणार अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि अखंडपणे आजही पाळत आहेत. मागील २५ वर्षांपासून ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात  आहे.सरपंच म्हणून मतदारसंघातील सर्वाधिक  लोकसंख्या असलेल्या गावाचा कायापालट करुन दाखवला. शासकीय योजना खेचून आणणे,त्यांची अंमलबजावणी करणे आणि विकासाची ही गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम राजाभाऊ यांनी केले आहे. हाच वसा आणि वारसा कायम अखंडपणे त्यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्वपरिचित हक्काचा माणूस

उद्यमी कार्यकर्ता! संवेदनशील युवा नेता दूरदृष्टीचा माणूस


                 -अक्षय मुंडे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?