इकोफ्रेंडली गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अनिल आदुडे यांचा श्री.केदारी महाराज विद्यामंदीर,नंदनज शाळेच्यावतीने सत्कार
इकोफ्रेंडली गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अनिल आदुडे यांचा श्री.केदारी महाराज विद्यामंदीर,नंदनज शाळेच्या वतीने सत्कार
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
द्वादश पंचम ज्योतीर्लिंग श्री.वैद्यनाथाच्या परळी नगरीतील निवासी व श्री.केदारी महाराज विद्यामंदीर,नंदनज ता.परळी -वैजनाथ येथील ज्येष्ठ शिक्षक श्री.अनिल आदुडे सर यांना लोकसत्ता, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती "पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट स्पर्धा" मधील छ.संभाजीनगर मराठवाडा विभागातून प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल श्री.संगमेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री.केदारी महाराज विद्यामंदीर,नंदनज शाळेच्यावतीने मुख्याध्यापक श्री.चेतन सौंदळे व सहकारी शिक्षक बांधवांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन करणे हे विद्यार्थ्यांसहीत प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून शाळेतील अध्यापक आदुडे सरांनी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातून प्रथम पारितोषिक मिळवणे अभिमान व गौरवास्पद असल्याची भावना चेतन सौंदळे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केली.
प्रदूषणग्रस्त परळी- वैजनाथ नगरीतील श्री.अनिल आदुडे व परीवाराने श्री.गणेश उत्सव काळात त्यांच्या निवासस्थानी कागदापासून तयार केलेल्या श्री.गणेशाची स्थापना करून "वाचू आनंदे वाचवू आनंदे" या सामाजिक संदेशाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जपत वृक्ष लागवड -संवर्धन करून आनंदी जीवन जगण्यासह पर्यावरण संतुलनाचा संदेश देण्यात आला.
प्लास्टर अॉफ पॅरीस पासून तयार करण्यात येणा-या मूर्तीच्या पाण्यातील विसर्जनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणीय जोपासना करण्याकरिता दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व दै.लोकसत्ताच्यावतीने सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या स्पर्धेत आदुडे परीवाराने सहभाग घेऊन छ.संभाजी नगर मराठवाडा विभागातून प्रथम पारितोषिक मिळवले पारितोषिक पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथे संपन्न झाला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अग्रगण्य दै.लोकसत्ताचा प्रथम पुरस्कार मिळवल्याबद्दल सहशिक्षक श्री.अनिल आदुडे यांचे श्री.संगमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.विष्णूदास मुंडे,संस्थापक सचिव श्री.जी.एस सौंदळे व पदाधिकारी,मुख्याध्यापक चेतन सौंदळे तसेच शाळेतील सहशिक्षक श्री.लक्ष्मण फड,श्री.मोतीराम पवार,श्री.गुलाब कदम,श्री.सुरेश तांदळे,श्री.रामदास नागरगोजे,श्री.रामेश्वर कस्तुरे व कर्मचारी श्री.दत्ता लोखंडे यांच्यावतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा