ॲड. श्रुती स्वामी यांचे वकिली व्यवसायात पदार्पण
ॲड. श्रुती स्वामी यांचे वकिली व्यवसायात पदार्पण
परळी वैजनाथ(प्रतिनिधी)- येथील लोकमत टाईम्स चे पत्रकार प्रा. राजू कोकलगावे (स्वामी) यांची कन्या कु.श्रुती राजू स्वामी यांनी पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयातून बी ए. एलएल बी पदवी प्राप्त केली असून त्यांनी वकिली व्यवसायात नुकतेच पदार्पण केले आहे.
ॲड. श्रुती स्वामी यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण परळीत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या नामांकित इंडियन लॉ सोसायटीच्या विधी महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयएलएस लॉ कॉलेजमधून बी ए. एलएल बी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून त्यांनी घवघवीत यश मिळविले असून महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिल कडे नोंदणी करून वकिलीच्या क्षेत्रामध्ये दमदार पाऊल टाकले आहे.
वकिली व्यवसायातील पदार्पणासाठी व यापुढील भावी वाटचालीसाठी त्यांच्यावर सहकारी वकील मंडळी तसेच हितचिंतक, नातेवाईक व मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा