कम्युनिस्ट पार्टी उतरणार मैदानात...
परळी मतदारसंघात चुरस वाढली :माकप देणार विधानसभेला लढा !
परळी व माजलगाव विधानसभा मतदारसंघ माकप लढविणार. कॉ पी एस घाडगे
परळी वै ता. १९ प्रतिनिधी
विद्यार्थी, युवक, शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माकप परळी वै व माजलगाव विधानसभा मतदारसंघातुन निवडणुक लढविणार आहे. सत्ताधारी व विरोधक जनतेच्या प्रश्नां ऐवजी भावनिक प्रश्न पुढे करीत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत माकप निवडणुक लढविणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ पी एस घाडगे यांनी दिली आहे.
केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सरकारने शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नाची सोडवणुक करण्या ऐवजी प्रश्न वाढले आहेत. युवकांच्या हाताला काम नाही. मतदारांमध्ये विद्यमान सरकार विषयी चिड निर्माण झालेली आहे. राज्यात धर्म व जातीयवादावर निवडणुक लढविली जात आहे. जनतेच्या प्रश्नांना जाणीवपूर्वक दुर्लक्षीत केले जात आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ व माजलगाव विधानसभा मतदारसंघातुन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निवडणुक लढविणार आहे. भाजपच्या सरकार चा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी सोबत माकप सामंजस्याची भुमिका घेत आहे. माकप बीड जिल्हा समिती ने राज्य समिती कडे दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. माकप राज्य समिती ने महाविकास आघाडी कडे दोन्ही मतदारसंघ मिळावे अशी आग्रही मागणी केली आहे. बीड जिल्ह्यात माकपने शेतकरी, कष्टकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार व विद्यार्थी-युवकांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलने केली आहेत. तसेच शोषित, वंचित व महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलने केली आहेत. दोन्ही मतदारसंघांत माकप ची संघटनात्मक बांधणी आहे. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये पक्षाला मानणारे व चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आहे. २०१८ पासुन केलेल्या आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयांचा पिक विमा लाखो शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यासह असंघटीत क्षेत्रातील कामगांराना न्याय मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे परळी वैजनाथ व माजलगाव मतदारसंघ महाविकास आघाडी ने माकप साठी सोडावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. दोन्ही मतदारसंघांत माकप ताकतीने निवडणुका लढविणार असल्याचे माकपचे राज्य समिती सदस्य कॉ पी एस घाडगे यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा