पाच हजार बक्षीस मिळवा-सौ.सुदामती गुट्टे
गोष्ट छोटी, डोंगरा एवढी: सुदामती गुट्टे यांनी परळीत महिलांसाठीच्या 'या' सुविधेवर जाहीर केलं इनाम !
परळी शहरात महिलांसाठी स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार बक्षीस मिळवा-सौ.सुदामतीताई गुट्टे
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
मतदार संघात केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कोणत्याच सोयी सुविधेकडे लक्ष दिलेले नाही. परळी शहराचा विचार केला तरी अगदी छोटी, क्षुल्लक मात्र अतिशय अत्यावश्यक असलेली सुविधाही नगरपरिषद देऊ शकलेली नाही. महिला वर्गाची प्रचंड कुचंबना यामुळे होते. परळी शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार रुपये बक्षीस मिळवा अशा प्रकारचे उपरोधिक इनामच रा.काॅ.शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांनी जाहीर केले आहे.
याबाबत माहिती देताना रा.काॅ.शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांनी सांगितले की, परळी शहर हे प्रभु वैद्यनाथाची नगरी म्हणून ओळखली जाते. राज्य परराज्यातील मोठ्या प्रमाणात महिला भाविक भक्त येत असतात. शिवाय परळी तालुक्यातील महिला, नागरिक बाजार करण्यासाठी परळी शहरात येतात. तेव्हा त्यांना कुठेही शौचालय दिसून येत नाहीत. एखादे असलेले तेही प्रचंड घाण, दुर्गंधी असलेले आहे. या नैसर्गिक विधी साठी महिलांना प्रचंड मानसिक त्रास होतो. केवळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी एवढी साधी सुविधाही एवढ्या वर्षात उपलब्ध करून देता आली नाही.त्यामुळेच मी परळी शहरात महिलांसाठी स्वच्छ शौचालय दाखवा आणि पाच हजार बक्षीस मिळवा अशी घोषणा केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा