मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

 सिरत-ऊन-नबी स्पर्धेत अलविया शेख हिला पहिले पारितोषिक

 मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण



परळी (प्रतिनिधी) : महेबूबिया एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने शहरातील विविध उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अंजुम उल उलुम शाळेतील अलविया  युनूस शेख हिने पहिले पारितोषिक पटकाविले. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील  उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 

स्पर्धेचे बक्षीस वितरण लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे पाहुण्यांच्या हस्ते झाले. मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्याविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धेत अलविया शेख हिने प्रथम बक्षीस मिळविले. तिला पाहुण्यांच्या हस्ते रोख रूपये सात हजार  प्रमाणपत्र व समृचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल हाजी शेख युसुफ, शेख युनूस, हाफेज इसा शेख, आसेफ शेख यासह शिक्षक व नातेवाईकांनी कौतुक करून अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार