ऊर्जा विभागाकडुन शासन निर्णय निर्गमित; क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा
धनंजय मुंडेंचे परळी क्रीडा संकुल उभारणीसाठी मोठे पाऊल, महानिर्मितीची 5 हेक्टर 30 आर जागा क्रीडा संकुलासाठी मोफत हस्तांतरित!
ऊर्जा विभागाकडुन शासन निर्णय निर्गमित; क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा
मुंबई (दि. 14) - परळी वैजनाथ शहरातील व तालुक्यातील नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठे पाऊल उचलले असून, परळी शहरालगतच्या जलालपूर येथील 5 हेक्टर 30 आर जागा क्रीडा संकुलास मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून ऊर्जा विभागाने घेतला आहे.
सदर 5 हेक्टर 30 आर जमीन महानिर्मिती कडून मोफत घेऊन ती महसूल विभागास हस्तांतरित करण्यात येत असून, याबाबातचा शासन निर्णय आज उद्योग-ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केला आहे. त्यामुळे आता परळीच्या क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
परळीच्या मातीतून विविध क्रीडा प्रकारातील अनेक खेळाडू राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. दरवर्षी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर क्रिकेटसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले जाते. मात्र या खेळाडूंना सरावासाठी क्रीडा संकुल उपलब्ध नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत होती.
त्यादृष्टीने धनंजय मुंडे यांनी क्रीडा विभागामार्फत राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यामार्फत जमीन ऊर्जा विभागाकडून हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर आज यश आले असून महानिर्मितीच्या परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या मालकीची जलालपुर येथील 8.5 हेक्टर जागेपैकी वापरात नसलेली व भविष्यात कोणतेही प्रयोजन नसलेली 5 हेक्टर 30 आर जमीन क्रीडा संकुलासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परळीत धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार भव्य क्रीडा संकुल अद्ययावत सोयी-सुविधांसह उभारले जावे यासाठी मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 कोटी 75 लाख रुपयांच्या आराखड्यास याआधीच मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे क्रीडा संकुल उभारणीसाठी पुरेसा निधीही उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी बीड यांचे मार्फत सदर जमीन क्रीडा विभागास हस्तांतरित करून उभारणीबाबतची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी असे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच या निर्णयाबद्दल श्री मुंडे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
परळी वैजनाथ मधे यु 9 800 मेगावॅट
उत्तर द्याहटवापाहीजे होते बेरोजगार प्रश्न उपस्थित आहे