२६ नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल- निवडणूक आयोग

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान; 23 नोव्हेंबरला निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा




महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच फेजमध्ये होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील.

लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार आहे. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल.

ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी ८५ वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते.

85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार
महाराष्ट्रात १ लाख १८६ पोलिंग स्टेशन, 57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन, शहरी 42 हजार 582 पोलिंग स्टेशन

85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार

मोठीं रांग असेल तर मध्ये खुर्ची व्यवस्था केली जाणार


महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार
Maharashtra Assembly Election Date 2024 : महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत.

यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहेत. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे.

२६ नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल- निवडणूक आयोग

येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार बनेल – केंद्रीय निवडणूक आयोग







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?