यंदा १००० मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट
ना. धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप : डॉ. संतोष मुंडे
यंदा १००० मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून ७ व ८ ऑक्टोबर रोजी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबीर आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.
आजवर ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४६०० गरजूंना मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आगामी शिबिराद्वारे १००० गरजूंना श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले.
दिव्यांग मंत्रालय व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांना हे डिजिटल श्रवणयंत्र वितरित केले जाणार आहेत. श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबिरासाठी नावं नोंदणी ४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये करावी असे आवाहन शिबिराचे संयोजक डॉ. संतोष मुंडेंनी केले आहे तसेच हे शिबिर परळी मतदार संघातील गरजू नागरिकांसाठीच आहे असेही त्यांनी सांगितले.
ज्यांनी नावं नोंदणी केली आहे अशा रुग्णांना दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान श्रीनाथ हॉस्पिटल येथे श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप केले जाईल. दिव्यांगांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ना. धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून आयोजित केलेल्या या उपक्रमाचा कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर, जेष्ठ नागरिक, महिला तथा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग मंत्रालय उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक डॉ. संतोष मुंडेंनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा