दुःखद वार्ता: कांताबाई मव्हाळे यांचे निधन
भाजप नेते शिवाजीराव मव्हाळे यांना मातृशोक; कांताबाई मव्हाळे यांचे निधन
सोनपेठ, प्रतिनिधी...
परभणी जिल्हा भाजपाचे नेते शिवाजीराव मव्हाळे यांच्या मातोश्री कांताबाई बाबुराव मव्हाळे यांचे आज दि.4 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्या 70 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत कांताबाई बाबुराव मव्हाळे या अतिशय कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून सर्वपरिचित होत्या. आपल्या कुटुंबाचा एक आधारवड म्हणून त्यांची ओळख होती. वृद्धापकाळाने आज दि. ४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर खडका येथे आज दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने मव्हाळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा