नामांतर: परळीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता 'स्व.गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था'

नामांतर: परळीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता 'स्व.गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था'

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
        शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणानुसार विविध ठिकाणच्या औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थांना विविध लोकनेत्यांची नावे देण्यात आली आहेत यामध्ये परळी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाम फलक अनावरण व नामांतर समारंभ औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी येथे घेण्यात आला.
            महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या धोरणानुसार परळी वैद्यनाथ शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते 'स्व.गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था' असे करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकृत नामांतराचे फलक लावण्यात आले. यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी वैजनाथ च्या वतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय शिक्षणाधिकारी अवताडे, परळी आयटीआय चे प्राचार्य एस. एस. लोखंडे यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार