अन्यथा निवडणूकीत मतदान करायचे का नाही तो विचार करावा लागेल-भैयासाहेब आदोडे
भिमवाडी बौध्द विहारासह नागरी समस्या त्वरित दुर करा
अन्यथा निवडणूकीत मतदान करायचे का नाही तो विचार करावा लागेल-भैयासाहेब आदोडे
परळी प्रतिनिधी गेली सात ते आठ वर्षांपासून भिमवाडी येथील धार्मिक विधी साठी असलेले बौद्ध विहार आधु-या कामामुळे अनुयायांना धार्मिक कार्यक्रम करता येत नाहीत या न.प.प्रशासनाच्या उधासीन धोरणामुळे भिमवाडी या वस्तीतील बोअर बंद,कुठे नाल्या नाही तर कुठे नाल्या भरलेल्या असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने केवळ मताचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी व न.प.प्रशासनाने या कडे त्वरित लक्षकेद्रित करुन कामे करावे अन्यथा होऊ घातलेल्या निवडणूकीत मतदान करावे की नाही अथवा बहिष्कार टाकावा लागेल असा खणखणीत इशाराच सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे सर यांनी यावेळी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे सर यांनी पुढे बोलताना सांगितले कि,शहरातील एक महत्वाची असलेली भिमवाडी ही एक मोठी वस्ती म्हणून ओळख आहे.या वस्ती कडे केवळ मताचे राजकारण म्हणून न पाहता त्याठिकाणी नागरी सुविधा पण प्रशासनाने किंवा न.पवर सत्ता असलेल्या नेत्यांनी देणे गरजेचे असते याचे भान जाग्यावर आणण्यासाठी होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणूकीवर मतदान करायचे का नाही याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. याचे कारण ही तेवढे च आहे न.प.च्या उधासीन कारभारामुळे गेली कित्येक वर्षांपासून बौध्द विहाराचे रखडुन आहे वेळोवेळी न.प.व.जिल्हा प्रशासनाला निवदनाद्वारे मागणी करुन ही दखल घेतली जात नाही दखल घेतली तरी थातुरमातुर काम करुन वेळमारुन घेतली जाते आज तागायत ते विहार अधुरेच आहे.शिवाय तीन बोअर बंद अवस्थेत आहेत.बौद्ध विहारासमोरील नालीचे कामही अधुरे आहे,पावसाळ्यात अनेक घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची घटना घडून गेली परंतु आज पर्यंत नुकसान भरपाई दिली गेली नाही यासह अनेक नागरी सुविधा चा अभाव असल्यामुळेच प्रशासनाने जाणीव पुर्वक भिमवाडी कडे लक्ष देणे सोडले कि काय असा प्रश्न उपस्थित करावा लागत आहे.जर प्रशासन किंवा मतावर डोळा ठेवणा-यावर यापुढे मतदान करायचे की नाही याचा विचार करावा लागेल असा भिमवाडीतील नागरिक विचार करत आहेत.या मागण्या त्वरित पुर्ण न केल्यास निवडणूकीत मतदान करायचे का नाही तो विचार करावा लागेल असा इशारा च सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब आदोडे यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा