ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय निर्गमित
पालकमंत्री धनंजय मुंडेंचा विकासनिधी खेचून आणण्याचा धडाका सुरूच; बंजारा/लमाण तांड्यांच्या विकासासाठी 9.50 कोटी निधी मंजूर
ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय निर्गमित
मुंबई (दि. 11) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विविध विभागाच्या मार्फत बीड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील विकास कामांना निधी खेचून आणण्याचा धडाकाच सुरू केला आहे. ग्रामविकास विभागाच्या संत सेवालाल महाराज बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनेतून परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील बंजारा/लमाण तांड्यांच्या विकासासाठी नऊ कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून बीड जिल्ह्यातील बहुतांश तांड्यांना सम प्रमाणात निधी देण्यात आला आहे. याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.
नुकतेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून 28 हजार घरकुलांसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापाठोपाठ जिल्ह्याचे उद्योग भवन, विविध रस्त्यांची दर्जा उन्नती, यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विविध विकास कामांना निधी खेचून आणण्याचा सध्या धडाका सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा