स्वतःच्या ताफ्यातील वाहन हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी दिले; अपघातग्रस्तांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी मुंडेंच्या सूचना
रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धनंजय मुंडे धावले
स्वतःच्या ताफ्यातील वाहन हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी दिले; अपघातग्रस्तांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी मुंडेंच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर (दि. 09) - कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज छत्रपती संभाजीनगर येथील कामकाज आटोपून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात असताना संभाजीनगर शहरालगतच्या हरसुल-सावंगी या या टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी धनंजय मुंडे धावले.
धनंजय मुंडे हे समृद्धी महामार्गाकडे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. एक पुरुष व एक महिला मोटरसायकल वरून जात असताना एका वाहनाने त्यांना जोराची धडक दिली, त्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्या शरीरातून मोठा रक्तस्त्राव होत होता.
धनंजय मुंडे यांनी तातडीने आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. स्वतःचा स्टाफ आणि जवळ आज उभ्या असणाऱ्या माणसांच्या मदतीने या जखमींना आपल्या ताफ्यातील सुरक्षेचे पोलीस वाहन उपलब्ध करून दिले व गाडीत रुग्णांना घेऊन तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये जाण्याची सूचना केली.
माझ्यासोबत सुरक्षा साठी वाहन नसले तरी चालेल मात्र आधी या जखमींना घेऊन हॉस्पिटलमध्ये जा, अशी सक्त ताकीदच त्यांनी वाहनचालकाला दिली. तसेच तातडीने घाटे रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांना फोन करून जखमींना योग्य ते उपचार करण्याच्या सूचनाही मुंडेंनी दिल्या.
या दांपत्याला धडक देऊन निघून गेलेल्या गाडीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत स्थानिक पोलिसांनाही धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या आहेत.
धनंजय मुंडे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असून अशा प्रसंगी तातडीने मदतीला जाण्याबाबत ते नेहमीच तत्पर असतात, त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा