परळी वैजनाथ ते अंबाजोगाई: श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरती ग्रुपची पायी दिंडी

परळी वैजनाथ ते अंबाजोगाई: श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरती ग्रुपची पायी दिंडी 




परळी वैजनाथ /प्रतिनिधी


रविवार, 6 ऑक्टोबर रोजी, पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ आरती ग्रुपच्या वतीने परळी वैजनाथ येथून अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी 111 भाविकांची भव्य पायी दिंडी निघाली. या दिंडीचे ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई राजा उदो उदो चा जयघोष व ढोल ताशाच्या निनादात हा पायी दिंडी सोहळा निघाला होता.


गेल्या सात वर्षांपासून नवरात्रीमध्ये श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरती ग्रुपच्या सदस्यांनी या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. रविवारी रात्री एक वाजता ढोल ताशांच्या गजरात व "आई राजा उदो उदो" च्या जयघोषात हा सोहळा प्रारंभ झाला.


दिंडीची सोहळा पहाटे पाच वाजता अंबाजोगाईत दाखल झाली. येथे संत श्री भगवान बाबा चौकात पोचल्यावर व्यापारी श्री पंपटवार यांच्या वतीने सर्व भाविकांना चहा, पाणी आणि नाश्ता देण्यात आला. योगेश्वरी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती.

तसेच, सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या  महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळी वैजनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र सोनी यांच्या हस्ते सर्व भाविकांना "नमामि वैद्यनाथम" नावाचे शर्ट भेट देण्यात आले. श्री योगेश्वरी देवी मंदिरात रविवारी भाविकांची गर्दी वाढल्यामुळे परळीचे माजी नगरसेवक श्री राजेंद्र सोनी यांनी श्री योगेश्वरी देवस्थानचे नवनिर्वाचित सचिव प्रा.लोमटे यांच्याशी चर्चा करून परळी ते अंबाजोगाई पायी दिंडी सोहळ्यातील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरती ग्रुपच्या 101 सदस्यांना विशेष रांगेद्वारे विनामूल्य दर्शन घडवले.  योगेश्वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्व भाविकांनी समाधान व्यक्त केले.


या दिंडीने भक्तीचा आणि एकतेचा अद्भुत अनुभव दिला, ज्यामुळे सर्व भाविकांच्या मनात आनंद आणि संतोषाचे वातावरण निर्माण झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?