परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

टेम्पोतुन जप्त केलेल्या एका बैलाचा मृत्यु

 हैद्राबादकडे कत्तलीसाठी जात असलेल्या 18 बैलांची मुक्तता,तिघांविरुध्द गुन्हा


टेम्पोतुन जप्त केलेल्या एका बैलाचा मृत्यु

परळी (प्रतिनिधी)

 वडोदा बाजार येथुन हैद्राबादकडे एका टेम्पोमध्ये एकमेकांचे तोंड बांधून कत्तलीसाठी जात असलेल्या 18 बैलांची सुटका काही युवकांनी केली.याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात सिल्लोड येथील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुटका करण्यात आलेल्या 18 पैकी एका बैलाचा दुर्देवाने मृत्यु झाला.

 सिरसाळा परिसरातील काही युवकांना एका टेम्पोतुन हैद्राबादकडे कत्तलीसाठी जनावरे जाणार असल्याची माहिती मिळताच आकाश लक्ष्मण तांबडे व अन्य युवक दि.13 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास जवळा पाटीवर थांबल्यानंतर आलेल्या एका टेम्पोला थांबण्याचा प्रयत्न केला परंतु हा टेम्पो न थांबल्याने त्याचा पाठलाग करत परळी येथील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर अडवला असता त्यात 4 लाख 26 हजार रुपये किंमतीचे 18 बैल आढळुन आले.याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांना कळविल्यानंतर आकाश तांबडे यांच्या फिर्यादीवरुन  सिल्लोड,जि.छत्रपती संभाजीनगर येथील शेख मोसिन शेख बशीर,आरबाज मस्तान शेख व कादीर शेख नजीर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेल्या 18 बैलापैकी एका बैलाचा दि.14 ऑक्टोबर रोजी मृत्यु झाल्याने त्याचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.जप्त केलेले सर्व बैल गोशाळेत सोडणार असल्याचे पो.नि.धनंजय ढोने यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!