कोणतेही शक्ती प्रदर्शन, रॅली किंवा सभेचे नसणार आयोजन

 कृषिमंत्री धनंजय मुंडे गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी भरणार साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज


आ.पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी राहणार उपस्थित


कोणतेही शक्ती प्रदर्शन, रॅली किंवा सभेचे नसणार आयोजन


परळी वैद्यनाथ (दि.22) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत साध्या पद्धतीने भरणार आहेत. 


उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. 

         नेहमी रेकॉर्डब्रेक गर्दी व विक्रमी सभांचे आयोजन करणारे धनंजय मुंडे हे यावेळी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कोणतेही शक्ती प्रदर्शन रॅली किंवा सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.



          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !