वैद्यनाथ मंदिर शिखर प्रकरणाला नवे वळण
वैद्यनाथ मंदिर शिखर प्रकरणाला नवे वळण: दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल; ट्रस्टच्या विश्वस्तांनी मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याची दीपक देशमुख यांची पोलिसात तक्रार
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या व कायम संवेदनशील असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर चढुन बांधकाम पाडल्यानंतर माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख व इतर तीन जणांविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले असून दीपक देशमुख यांनी देवस्थान ट्रस्टचे सचिव व विश्वस्तांनी आपल्या घरी येऊन शिवीगाळ व मारहाण करत वेळ मरण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आहे.
माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर चढुन बांधकाम पाडले.याप्रकरणी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव बाबासाहेब देशमुख यांच्या फिर्यादीवरुन सोमवार दि.14 ऑक्टोबर रोजी रात्री दिपक देशमुख व इतर 3 जणांविरुध्द कलम 298,299,3/5,भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाला नवे वळण....
या प्रकरणाने नवे वळण घेतले असून दीपक देशमुख यांनी देवस्थान ट्रस्टचे सचिव व विश्वस्तांनी आपल्या घरी येऊन शिवीगाळ व मारहाण करत वेळ मरण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, "अशा मागण्या का करतो, तु कोण आहेस.. यापुर्वी तक्रारी का दिल्यास, माहिती अधिकाराचे अर्ज का देतोस," असे म्हणत ट्रस्टचे सचिव व इतर ६ ते ७ ट्रस्टी माझ्या राहत्या घरी येवून मला व माझ्या कुटूंबीयास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली व धमकवण्यात आले.खबरदार यापुढे "दर्शन प्रवेशपास तिकीटाबद्दल बोलशिल, वैद्यनाथ मंदिरच्या सर्वे नं.४१० वैधित, स्थावर व जंगम मालमत्तेबद्दल विचारांना करशील तर जिवे मारण्यात येईल" अशी धमकी दिली असा तक्रार अर्ज देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी दीपक देशमुख यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा