राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांना पितृशोक

वडखेल येथील तुकाराम मारोती देवकते यांचे निधन


राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांना पितृशोक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील वडखेल येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम मारोती देवकते यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. वडखेल ग्रामपंचायतचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष गणेश देवकते यांचे ते वडील होत. शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८. वाजता वडखेल येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

       वडखेल येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम मारोती देवकते यांचे गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. कै.तुकाराम मारोती देवकते हे सर्वांशी सुपरिचित व्यक्तिमत्व होते. कै. तुकाराम देवकते हे वारकरी होते. त्यांनी तंटामुक्तीचे अध्यक्षपद १० वर्ष भुषविले आहे.  अनेक सामाजिक कार्यात ते अग्रणी होते. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली. कै.तुकाराम मारोती देवकते यांच्या पाश्चात्य २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत तुकाराम देवकते यांच्या पार्थिवावर आज परळी तालुक्यातील वडखेल येथे सकाळी ८ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !