कार्यकर्त्यांच्या भावना घेतल्या जाणून;भव्य कार्यकर्ता बैठकीतून घोषणा!
परळी विधानसभे संदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार - प्रा.टी.पी.मुंडे
कार्यकर्त्यांच्या भावना घेतल्या जाणून;भव्य कार्यकर्ता बैठकीतून घोषणा!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...
ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी दोन दिवसात परळी विधानसभा मतदारसंघ संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेणार असल्याची घोषणा केली. आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी औद्योगिक वसाहत सभागृह येथे भव्य कार्यकर्ता बैठक संपन्न झाली त्यांनी ही घोषणा केली आहे. सर तुम्ही फक्त निर्णय घ्या आम्ही तुमच्या निर्णयाचे पालन करू अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तसेच पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेते आनंदराज आंबेडकर, मा. वामन मेश्राम, प्रकाश अण्णा शेंडगे आदींना सोबत घेऊन आरक्षणवादी आघाडी च्या माध्यमातून महाराष्ट्रातील 288 मतदार संघातील विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना मानणारा गावोगावी मोठा वर्ग आहे त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये परळी विधानसभा निवडणूक प्रा.टी.पी.मुंडे सरांनी लढवावी तर काहींच्या मते विचार विनिमय करून आणि पक्षाच्या कोर कमिटी मध्ये चर्चा करून निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली.
त्यावर त्यांनी दोन दिवसांमध्ये विचारविनिमय करूनच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 35 वर्षापासून आपण राजकारणामध्ये सक्रिय आहोत तसेच जिथे अन्याय तेथे आपण असे समीकरण तयार झाले आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी शेतमजूर दलित अल्पसंख्यांक कष्टकरी यांच्या प्रश्नासाठी गेल्या 35 वर्षापासून आपण लढत आहोत त्यामुळेच आपल्यावर कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण जो निर्णय घेऊ त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाला कलाटणी देणारा असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी रफिक कुरेशी, भीमराव मुंडे,विनायक गडदे, कल्याणराव भगत, आप्पाराव पांढरे, सूर्यकांत मुंडे, प्रभू आप्पा तोंडारे,आदीसह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा नेते प्रा.विजय मुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. संदिपान मुंडे यांनी केले.
यावेळी जि प सदस्य प्रदीप भैय्या मुंडे उर्फ बबलू शेठ,रावसाहेब शिंदे, माणिकराव सलगर, गंगाधर तारसे, छत्रपती कावळे, भागवत बप्पा सलगर, जम्मू सेठ, रामकिसन घाडगे, संतराम गडदे, ज्ञानोबा पाटील नवगरे, रघुनाथ डोळस, श्याम गडेकर,घाडगे ताई, नागेश व्हावले,अँड.मनोज संकाये, राहुल कांदे, हनुमंत गुट्टे, किशोर जाधव, श्रीमंत कांगणे , इंद्रजीत दहिफळे, प्रभाकर गवळी, शफीभाई , मुरलीधर महाराज गडदे, श्रीकिसन सातभाई, नरहरी आघाव, मधुकर ढाकणे, गणीभाई, बंडू कांदे,युवा नेते राहुल कराड आदीसह हजारो नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा