परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

यादीत कुणाची नावं आहेत?

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी


एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ३१ नावांचा समावेश आहे.शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे आणि सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीच्या जागावाटपाचं काम जवळपास होत आलं आहे आणि लवकरच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाने ९९ जागांची यादी जाहीर केली. तर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे आणि सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीच्या जागावाटपाचं काम जवळपास होत आलं आहे आणि लवकरच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपाने ९९ जागांची यादी जाहीर केली. तर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.


यादीत कुणाची नावं आहेत?

एकनाथ शिंदे, कोपरी पाचपाखाडी

मंजुळाताई गावित,साक्री

चंद्रकांत सोनवणे,चोपडा

गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण

अमोल पाटील, एरंडोल

किशोर पाटील, पाचोरा

चंद्राकांत पाटील, मुक्ताईनगर

संजय गायकवाड, बुलढाणा

संजय रायमुलकर, मेहकर

अभिजित अडसूळ, दर्यापूर

आशिष जैस्वाल, रामटेक

नरेंद्र भोंडेकर, भंडारा

संजय राठोड, दिग्रस

बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर

संतोष बांगर, कळमनुरी

अर्जुन खोतकर, जालना

अब्दुल सत्तार, सिल्लोड

प्रदीप जैस्वाल, छ. संभाजीनगर मध्य

संजय शिरसाट, छ. संभाजीनगर पश्चिम

विलास संदिपान भूमरे, पैठण

रमेश बोरनारे, वैजापूर

दादा भुसे, मालेगाव बाह्य

प्रताप सरनाईक, ओवळा माजीवाडा

प्रकाश सुर्वे, मागाठाणे

मनिषा वायकर, जोगेश्वरी पूर्व

दिलीप लांडे, चांदिवली

मंगेश कुडाळकर, कुर्ला

सदा सरवणकर, माहीम

यामिनी जाधव, भायखळा

महेंद्र थोरवे, कर्जत

महेंद्र दळवी, अलिबाग

भरतशेठ गोगावले, महाड

ज्ञानराज चौगुले, उमरगा

तानाजी सावंत, परांडा

शहाजीबापू पाटील, सांगोला

महेश शिंदे, कोरेगाव

योगेश कदम, दापोली

शंभूराज देसाई, पाटण

उदय सामंत, रत्नागिरी

किरण सामंत, राजापूर

दीपक केसरकर, सावंतवाडी

प्रकाश आबिटकर, राधानगरी

चंद्रदीप नरके, करवीर

सुहास बाबर, खानापूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या विजयी शुभेच्छा!

अशी ४५ नावं जाहीर कऱण्यात आली आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा. अशी पोस्टही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिली आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!