कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त किर्तनात प्रतिपादन
जन्म-मरण अटळ:सर्व परिस्थितींमध्ये स्थिर रहावे हीच संतांची शिकवण - हभप रामराव महाराज ढोक
कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त किर्तनात प्रतिपादन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी... आपल्या वाटेला आलेले भोग हे आपल्या ला भोगावेच लागतात. आपल्या तरुण मुलाचा आकस्मिक व अकालमृत्यू होणं ही कोणाही बापासाठी अत्यंत वेदनादायक व दु:खसागरात लोटणारीच बाब असते.मात्र जन्म-मरण हे अटळ आहे. त्यामुळे या दुःख अवेगातून सावरून सर्व परिस्थितींमध्ये स्थिर रहावे हीच संतांची शिकवण असल्याचे प्रतिपादन हभप रामराव महाराज ढोक यांनी लिंबोटा येथे कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित किर्तनात केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांचे चिरंजीव कै.राजपान कराड यांच्या पुण्यतिथी निमीत्त लिंबोटा येथे रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे किर्तन झाले. याप्रसंगी फुलचंद राव कराड यांनी ह भ प रामराव महाराज ढोक यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. यावेळी 'आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनियां' या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर विवेचन करतांना ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी सांगितले की,फुलचंदराव कराड यांचे चिरंजीव राजपान कराड यांचे गतवर्षी अकाली निधन झाले. आपल्या तरुण मुलाचा आकस्मिक व अकालमृत्यू होणं ही कोणाही बापासाठी अत्यंत वेदनादायक व दु:खसागरात लोटणारीच बाब असते.मात्र हा आपल्या वाट्याला आलेला भोग भोगावाच लागतो. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज सर्व परिस्थितींमध्ये कसे स्थिर रहावे हे सांगतात. आपल्या वाटेला आलेले भोग हे आपण जाणले पाहिजे आणि देवाला सांगुन की तुम्ही जे करण्यास इच्छित आहात ते तुम्ही करा, ती तुमची कृपा समजुन मी ते भोगण्यास सादर आहे.अशा भावात जर भगवंतांना समर्पित झालो तर तो कृपासिंधु सर्व संकटे निवारण करुन घेईल. जर त्या संकटांना, भोगांना घाबरुन राहिललत तर सदैव दु:खामध्ये राहू. परंतु जर भगवंतांना शरण गेलो तर कसलेही दु:ख उरणार नाहीं.त्यामुळेच आता तुम्ही सर्व निश्चिंत व्हा, भगवंतांचे भजन करा, सर्व व्याधी दु:खे यांचा लवलेश ही उरणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील प्रमुख शांतीसागर ह भ प महादेव महाराज साखरवाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ह भ प रविदास महाराज जगदाळे मनोहर महाराज मुंडे बिबीशन महाराज कोकाटे प्रकाश महाराज मुरकुटे दत्ता महाराज सोनवणे जगदीश महाराज सोनवणे भरत महाराज जोगी भरत महाराज गुट्टे राम महाराज मुंडे सचिन महाराज गीते राजाभाऊ महाराज मुंडे माऊली मुंडे किशन कराड मृदंग वादक राम महाराज काजळे पंडित गिरी भरत सोडगीर दत्तापूर महाराज त्याचबरोबर माऊली फड बंकटराव कांदे विश्राम पवार संदिपान आंधळे यांच्यासह टाळकरी वादक गायक महाराज मंडळी वारकरी संप्रदायातील गुंजन मंडळी आप्तेष्ट नातेवाईक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा