राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाचे यश
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाचे यश
कु.तेजस्विनी सलगरे हिने पटकावले प्रथम पारितोषिक
परळी / प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे माजी खासदार, झुंजार स्वातंत्र्य सेनानी कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत परळी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तेजस्विनी सलगरे या विद्यार्थिनीने दमदार वक्तृत्व करत प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले.
कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले होते. अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून 350 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या वक्तृत्व स्पर्धेकरिता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील अधिष्टाता डॉ.शंकर धपाटे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रा.योगेश सुरवसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.या वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील इयत्ता 8 वि वर्गात शिक्षण घेत असलेली कु.तेजस्विनी नीलकंठ सलगरे हिने माध्यमिक गट ( 8 वि ते 10) मध्ये सहभाग नोंदवत दमदार वक्तृत्व सादर करत प्रेक्षकांसह परीक्षण करणाऱ्याला आपल्या वक्तृत्वाने मोहित करत प्रथम पारितोषिक पटकावले.
कु.तेजस्विनी सलगरे हिच्या या यशाबद्दल तिचा आणि तिच्या पालकांचा शाळेच्या वतीने शाल-पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर बोराडे, उपमुख्याध्यापक सुरेंद्र हरदास, जेष्ठ शिक्षक शेख सर आदींसह तेजस्विनी सलगरे हिचे पालक व्यासपिठावर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा