महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे परळी वैजनाथ मतदार संघात अभिजित देशमुख यांची उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून  परळी वैजनाथ मतदार संघात अभिजीत देशमुख यांची उमेदवारी जाहीर


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)..

     महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे परळी वैजनाथ मतदार संघात एन. के. देशमुख यांचे पुतणे उच्चविद्याविभूषित तसेच महत्वाकांक्षी उद्योजक असलेल्या अभिजित देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

         महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २३ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत मतदारसंघ क्र.२३३ परळी वैजनाथ येथे अभिजित देशमुख उमेदवारी जाहीर होताच मनसैनिकांत उत्साह संचारला आहे. याबाबत बोलताना मायबाप जनता आणि राज ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मनसैनिकांच्या सहाय्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असे प्रतिपादन अभिजित  देशमुख यांनी केले आहे.

        परळी वैजनाथचे यशस्वी नगराध्यक्ष असताना परळी वैजनाथ शहरात राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, नटराज रंग मंदिर, महात्मा फुले भाजी मंडई, पक्के आणि मजबूत रस्ते, दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम योजना आदी उत्तमोत्तम उपक्रम यशस्वी नगराध्यक्ष म्हणून एन. के. देशमुख यांनी राबविले होते आता त्यांचाच सक्षम वारसा अभिजित  देशमुख पुढे नेतील याची खात्री मनसैनिकांना आहे.



      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार